संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!

On: January 4, 2025 10:44 AM
Santosh Deshmukh Murder case big update  
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder case | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेतील फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या घटनेतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याआधीच पोलिसांना शरण आला होता. तो सध्या तुरुंगात आहे.त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच देशमुख हत्येतील तिन्ही फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यानंतर आठवडाभरातच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्याचे समजतेय.

फरार असलेल्या दोन आरोपींना अटक

या हत्ये प्रकरणात 7 आरोपींचा हात असल्याची माहिती आहे. यातील कथित मास्टरमाईंड वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. मात्र इतर तीन आरोपी फरार होते. अशात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाल्याची माहिती आहे. तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार होते.मात्र, आता त्यांनाही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.तर वाल्मिक कराड देखील सध्या तुरुंगात आहे.

विष्णू चाटेनी दिली धक्कादायक कबुली

तसेच अटकेत असलेल्या आरोपी विष्णू चाटे याने खंडणी प्रकरणी मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. कराडचे अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे झाल्याचे चाटे याने चौकशीत कबूल केले आहे. सीआयडीने याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात हा खुलासा झालाय.

दरम्यान, पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात 11 डिसेंबर 2023 रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे तिघे आरोपी आहेत.

News Title :  Santosh Deshmukh Murder case big update  

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

“हिंदीच बोलायचं, मराठीत बोलला तर…”; पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला, नेमकं काय घडलं?

शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार

“पुरुषांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स…”, प्रसिद्ध गायिकेचं विधान चर्चेत!

Join WhatsApp Group

Join Now