मारहाणीचे व्हिडिओ, राजकीय नेत्यांना कॉल; सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

On: December 30, 2024 11:00 AM
Santosh Deshmukh Murder Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder Case | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे गेला आहे. याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय. (Santosh Deshmukh Murder Case)

अशात या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच, कराड संबंधी आणखी दोन महिलांची देखील चौकशी करण्यात आलीये. अशात संतोष देशमुख यांना मारहाणीचे चार व्हिडीओही पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये आढळले आहेत.

मारहाणीचे ‘ते’ व्हिडिओ समोर

तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. याच मोबाइलवरून काही राजकीय नेत्यांना देखील कॉल करण्यात आल्याची आतली माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी त्यांची नावे आहेत.

तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोघांना तांबवा या गावातून ताब्यात घेण्यात आलं.तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून पकडलं. तसेच या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबतही एक अपडेट समोर आली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

वाल्मीक कराड आज सरेंडर होणार?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली.

सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. त्यात आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांना सापडले आहेत. याच मोबाइलमध्ये मारहाणीचे व्हिडिओ आढळले आहेत. (Santosh Deshmukh Murder Case)

News Title :  Santosh Deshmukh Murder Case 4 video in front

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदाराचा भीषण अपघात

‘अचानक-भयानक महिला वर्गाविषयी पुळका..’; प्राजक्ता माळी प्रकरणी किरण मानेंची पोस्ट

सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होणार?

ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Join WhatsApp Group

Join Now