महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

On: January 4, 2025 9:16 AM
Santosh Deshmukh Case Parbhani Muk Morcha
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी आज 4 जानेवारीरोजी परभणीत (Parbhani Muk Morcha) सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चा काढला जाणार आहे.

या मोर्चात स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी तसेच भाऊ धनंजय देशमुख, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

परभणीत आज मुकमोर्चा

आज सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. परभणीत नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात अनेक दिग्गज नेते सहभागी होणार असून परभणीत आज राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. परभणीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर आज हा मुकमोर्चा होत आहे.

या मूक मोर्चाचा मार्ग नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथुन निघुन महाराणा प्रताप चौक- शनी मंदिर – नानल पेठ कॉर्नर- शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळ मार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा असणार आहे.

याआधी बीडला निघाला होता मोर्चा

यापूर्वी बीड येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद ठेवण्यात आले होते. या मोर्चात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. तर, आज परभणीत पुन्हा मोर्चा काढला जाणार आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. तो 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याला कोर्टाने 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे हा देखील पोलीस कोठडीत आहे. दोघांचीही आता कसून चौकशी सुरू आहे.

News Title –  Santosh Deshmukh Case Parbhani Muk Morcha

महत्त्वाच्या बातम्या-

“हिंदीच बोलायचं, मराठीत बोलला तर…”; पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला, नेमकं काय घडलं?

शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार

“पुरुषांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स…”, प्रसिद्ध गायिकेचं विधान चर्चेत!

‘ते टॉप सिक्रेट…’; सुरेश धस यांच्या नव्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ

Join WhatsApp Group

Join Now