सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर

On: January 2, 2025 12:54 PM
Santosh Deshmukh case Big update regarding Sudarshan Ghule
---Advertisement---

Santosh Deshmukh case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. त्याची सध्या कसून चौकशी केली जातेय. आतापर्यंत या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. (Santosh Deshmukh case)

संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 25 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत. यामुळे मस्साजोग गावकऱ्यांसह राज्यातील विरोधी पक्षाकडूनही बीड पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी सीआयडीची एकूण 9 पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये जवळपास 150 जणांचा समावेश आहे. तर, आजच एसआयटीची देखील स्थापना करण्यात आलीये.

सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?

इतकी मोठी टीम असूनही अजून इतर तीन आरोपी हातात आले नाहीत. अशातच संतोष देशमुख प्रकरणातील एक मारेकरी देश सोडून पळाल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सात पथके विविध राज्यासह देशभर रवाना करण्यात आली आहेत. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून तो नेपाळमध्ये जाऊन लपला असल्याची माहिती आहे. (Santosh Deshmukh case)

काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले हा नेपाळला लपल्याची माहिती आहे. सीआयडीची पथके सध्या त्याचा कसून शोध घेत आहे. तो देशाबाहेर पळून गेला आहे का, याचा तपासही सीआयडीकडून केला जातोय. या प्रकरणाला महिना उलटत आलाय तरीही यातील मुख्य आरोपींना पकडण्यात यंत्रणेला यश आलेलं नाही.

वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट?

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, वाल्मिक कराडला (Walmik Karad ) अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच नवीन पलंग आणण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत गंभीर दावा केलाय. (Santosh Deshmukh case)

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्वीट देखील केलंय. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत, असं ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. या ट्वीटची देखील आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.

News Title :  Santosh Deshmukh case Big update regarding Sudarshan Ghule

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खुलासा होणार?, SIT मध्ये ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश

बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!

‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर

“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

Join WhatsApp Group

Join Now