Walmik Karad Surrender l गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. या घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इतर आरोपींना तात्काळ अटक करा :
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे बीड पोलीस आणि सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस काम करत असूनही त्यांना वाल्मिक कराड यांचा शोध लागला नव्हता. अखेर वाल्मिक कराड यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली.
वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मनातील वेदना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की “वाल्मिक कराडच्या शरणागतीने आमच्या कुटुंबाला थोडेफार समाधान मिळाले आहे, परंतु न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील. सीआयडीने या प्रकरणाचा तपास न्यायपूर्ण आणि पारदर्शकपणे करावा असे आमचे म्हणणे आहे. तसेच वाल्मिक कराडनंतर आता इतरही आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय सरपंच संतोष देशमुख हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही”,असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
Walmik Karad Surrender l बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडच्या सरेंडरवर केला संशय व्यक्त :
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की “वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांच्या शरणागतीच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आता या प्रकरणाचा तपास MCOCA अंतर्गत करण्याची मागणी आम्ही केली आहे”.
दरम्यान, वाल्मिक कराड यांच्या शरणागतीने पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण 22 दिवस राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला गुंगारा देऊन अखेर स्वतःच्या इच्छेने शरण येण्याची ही घटना पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
News Title : santosh deshmukh brother reacts walmik karad surrender
महत्त्वाच्या बातम्या-
सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड कुठे होता? कार्यकर्त्यांनी दिली महत्वाची माहिती
वाल्मिक कराडसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…
‘धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड एकाच….’, भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया
सुरेश धस अखेर नरमले, ‘त्या’ वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीची मागितली माफी
“गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलीस…”; देशमुखांच्या मुलीचा संतप्त सवाल






