Maharashtra l राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला अखेर 12 दिवसांनी नवा मख्यमंत्री मिळणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न होणार आहे. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे तीन नेते शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अशातच आता आज सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीने किती खात्यांची मागणी केली आहे हे सांगितलं आहे.
मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागणार? :
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी संजय काका पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी संजय काका पाटील म्हणाले, “आमचे नेते अजित पवार हे आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र हा एक विक्रम आहे. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.
दरम्यान, संजयकाका पाटील यांना वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीपदांबाबत काही चर्चा केली का? तसेच मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागणार आहे? असं विचारण्यात आलं. मात्र यावेळी संजय काका पाटील म्हणाले, “महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जितकी मंत्रीपदं मिळतील तितकीच मंत्रीपदं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील मागितली आहेत. मात्र ही वरच्या स्तरावरील चर्चा आहे. त्याववर वरिष्ठांमध्ये विचारविनिमय होऊन निश्चितपणे यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत.
Maharashtra l राष्ट्रवादी पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? :
नवीन सरकारमध्ये तुमच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाला किती मंत्रीपद मिळू शकतात? यावर संजय काका पाटील म्हणाले की, “साधारण 11 ते 12 मंत्रीपदं राष्ट्रवादी पक्षाला मिळू शकतात. तसेच आमची मागणी देखील तेवढीच आहे. त्यामुळेशिवसेनेला देखील तितकीच मंत्रीपदं दिली जाऊ शकतात”. असं पाटील म्हणाले आहेत.
News Title : sanjaykaka patil say ncp demands 12 ministry
महत्त्वाच्या बातम्या –
“एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”
हवामान विभागाने सावध राहण्याचं केलं आवाहन! यामागचं कारण काय?
शपथविधीआधी वर्षावर हायव्होल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!






