सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार? शिवसेना नेत्यानी दिली माहिती

On: December 23, 2024 2:56 PM
Vaibhavi Deshmukh
---Advertisement---

Santosh Deshmukh Case l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. त्यामुळे या धक्कादायक प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह राज्यातील नागरिक देखील करत आहेत. मात्र आता यासंदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे.

या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार :

9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मात्र या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. त्यामुळे राज्यातील वातावरण देखील चांगलंच ढवळून निघाल आहे. आत्तापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर, या घटनेतील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे पोलीस त्यांचा कसून असून शोध घेत आहेत.

अशातच आता या घटनेवरून राजकीय वातावरण देखील प्रचंड तापलं आहे. कारण विरोधकांकडून महायुती सरकारवर वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.

Santosh Deshmukh Case l संजय शिरसाट काय म्हणाले? :

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘‘28 डिसेंबरच्या आधी पोलीस संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करतील असा विश्वास आहे. तसेच या प्रकरणातील तपासा संदर्भात पोलीस अधीक्षकांना देखील सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता आरोपींच्या मागावर आमचे पथक असून लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचा शब्द पोलीस अधीक्षक यांनी दिला असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या हत्याकांड प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा देखील सभागृहात केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा मास्टरमाईंडचा कोण आहे याचा देखील शोध घेतला जाणार आहे.

News Title : Sanjay shirsath Statement on Beed Sarpanch Santosh Deshmukh Case

महत्वाच्या बातम्या –

महसूलमंत्री अ‍ॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले

ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?

‘या’ आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now