महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट! ‘या’ कारणास्तव संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

On: July 11, 2025 4:02 PM
Sanjay Shirsat
---Advertisement---

Sanjay Shirsat | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्यांच्या बेडरूममध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ माध्यमांसमोर आणत शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं असून, शिरसाट यांच्यावर कारवाईची मागणीही काही विरोधकांकडून जोर धरताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे संजय शिरसाट अडचणीत? :

व्हिडीओमध्ये मंत्री शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले दिसतात. त्यांच्या शेजारी ठेवलेल्या बॅगेत नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत. याशिवाय ते सिगारेट ओढताना व फोनवर बोलताना दिसतात. त्यांच्या पाळीव कुत्र्याचंही या दृश्यात दर्शन होतं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. (Sanjay Shirsat)

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं, “सत्ताधारी मंत्र्यांकडे अशा स्वरूपात रोख रक्कम असणे गंभीर आहे. माझ्याकडे पुरावा म्हणून व्हिडीओ आहे.” त्यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Sanjay Shirsat | आयकर विभागाची नोटीस आणि शिरसाट यांचा बचाव :

संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलावातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. एकीकडे या नोटीसेची चर्चा सुरू असतानाच, हा व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Sanjay Shirsat)

या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना शिरसाट म्हणाले, “त्या बॅगेत पैसे नाहीत, ती माझी ट्रॅव्हल बॅग आहे आणि तिच्यात कपडे आहेत.” त्यांनी संजय राऊतांवरही पलटवार करत, “त्यांना फक्त आरोप करायचे आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही,” असं म्हटलं. मात्र त्यांचं हे स्पष्टीकरण जनतेला कितपत समाधानकारक वाटतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

News Title: Sanjay Shirsat Viral Video Sparks Political Storm in Maharashtra; Bag Full of Cash or Just Clothes?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now