Sanjay Raut | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात पुढच्या महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यामुळे सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. अशात पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपये रोकड आढळली आहे. यामुळे पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut )
ही रक्कम सत्ताधारी आमदाराच्या गाडीतून सापडल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट देखील केलंय. या ट्वीटची आता जोरदार चर्चा रंगते आहे.
संजय राऊत यांचं ट्वीट-
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके?, असा सवाल करणारे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut )
संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांनी थेट शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी प्रत्येक उमेदवाराला 75 कोटी रुपये पाठवण्यात आल्याचा दावा देखील केला आहे. आता याला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, त्याकडे सर्वांचं लक्ष राहील.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान ही घबाड जप्त केली आहे. इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये ही रोकड आढळली. ही कार सांगोल्याची असून ती नलवडे नामक व्यक्तीच्या नावावर आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील माहिती मिळताच या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. ज्या गाडीत हे घबाड सापडलं ती कार नेमकी कुणाची?, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत. (Sanjay Raut )
News Title : Sanjay Raut target shinde group
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
आज मंगळवारी, कोणत्या राशीला मिळणार शुभवार्ता?; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
‘मी निवडणूक लढवणारच’; भाजप नेत्याचा लेक ऐकायलाच तयार नाही
मोठी बातमी! राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!






