Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. आता राजकीय नेत्यांकडून पाचव्या टप्प्यापूर्वी जोरदार प्रचार केला जातोय. राज्यात काल झालेल्या चौथ्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी मतदानाचा टक्का कमी आढळून आला. या पार्श्वभूमीवरच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीका केली.
राऊत यांनी पंतप्रधान पदाचा दावेदार, लोकसभेचा निकाल याबाबत मोठं भाकीत केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राऊत यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, असं म्हटलंय.
‘मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत’
“देशात मोदी आणि शहा यांनी जर ठरवलं तर ते कुणालाही तुरुंगात टाकू शकतात. मात्र, सत्ता कायम नसते. तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे असून त्यांनी देशाला तेच धडे दिले.”, असा हल्लाबोल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.
पुढे त्यांनी शिंदे-फडणवीस यांनाही टार्गेट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही, असा दावाच राऊत यांनी केलाय.
“…तर 2019 मध्येच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते”
तसंच आम्ही 30 ते 35 जागा जिंकणार असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय. ” ज्या पक्षाने सर्वस्व दिलं त्यासाठी मी लढत राहणार, मी पलायन करणार नाही, मी लढायला आणि मरायला तयार आहे. मी भाजपसोबत कधी जाणार नाही”, असं राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. “भाजपने शब्द पाळला असता तर 2019 मध्येच एकनाथ शिंदे मुखमंत्री असते. 2019 मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही.”, असा खुलासा करत राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे यांना टोला लगावला.
News Title : Sanjay Raut target narendra modi and amit shah
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा
अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं
‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले
‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण






