Sanjay Raut Health Update | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गंभीर आजारपणामुळे त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहावे लागणार आहे. ते थेट नवीन वर्षात पुनरागमन करतील. त्यांनी स्वतः पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली.
प्रकृतीत गंभीर बिघाड, कार्यकर्त्यांना भावनिक पत्र :
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी त्यांची नेहमीची पत्रकार परिषदही घेतली नाही, तेव्हापासूनच चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मुलुंड (Mulund) येथील फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांनी ट्विटरवर (Twitter) एक पत्रक प्रसिद्ध करून आपल्या प्रकृतीची गंभीर समस्या उघड केली.
आपल्या मित्रपरिवाराला आणि कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे की, “सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.”
Sanjay Raut Health Update | ठाकरे गटाची ‘धडाडती तोफ’ शांत, ऐन निवडणुकीत मोठा धक्का :
संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) (Thackeray Faction) पक्षाची ‘धडाडती तोफ’ म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) स्थापन करण्यात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका होती. तेव्हापासून ते सातत्याने आणि एकहाती ठाकरे गटाची बाजू लावून धरत आहेत.
दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडणे हा त्यांचा गेल्या काही वर्षांतील नित्यक्रम बनला होता. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीला (Mahayuti) नेत्यांची फौज उभी करावी लागली, तरी राऊत (Sanjay Raut) अनेकदा सर्वांना पुरून उरत होते. आता मुंबई (Mumbai) महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली असताना, राऊत (Sanjay Raut) यांचे राजकारणातून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.






