Sanjay Raut l राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीचा राज्यात मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला आहे. तसेच संजय राऊत यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खरपूस शब्दांत हल्लाबोल केला आहे.
सुप्रियाच्या लाडक्या भावाने रंग बदलला :
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे असा उल्लेख केला आहे. मात्र त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आहे. आता ते पिंक झाले आहेत असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच तुम्ही किती तोडा फोडा मात्र आमची एकी तुटणार नाही असं थेट इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावानी रंग बदलून ते आता पिंक झाले आहेत. तसेच रंग हा सरडा बदलतो मात्र ते अचानक गुलाबी झाले आहेत. आता हा पिंक सरडा बारामती देखील सोडणार आहे. मात्र आता ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही.
Sanjay Raut l गुलाबी रंग महाराष्ट्राला कसलाही धार्जीण नाही :
गुलाबी रंग हा महाराष्ट्राला कसलाही धार्जीण नाही. कारण आपला रंग हा भगवाच आहे. केसीआर पक्षाचा रंग पिंक होता, त्यांना सुद्धा आम्ही बोललो होतो की, पिंक नही चलेंगा… त्यामुळे महाराष्ट्रात एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल आणि भगवा रंगच तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे असा खरपूस शब्दांत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण सारखा ढोंग मी अजूनपर्यंत कधीच पाहिला नाही. राज्यात अनेक योजना देखील आल्या आहे. मात्र सरकारी पैशाने मतं विकत घेण्याची ही योजना नवीनच आली आहे. मात्र महाविकास आघाडीचं नातं हे पैशाच्या पलीकडे आहे.
News Title- Sanjay Raut Against Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या-
‘देवाची नव्हे तर नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!’ अजित पवारांचं वक्तव्य
‘आर्ची’ फेम रिंकू राजगुरूला मिळाला रियल लाईफ ‘परशा’?; म्हणाली, “माझ्या आयुष्यात.. “
गौतम अदानींसाठी सुजय विखे झाले ड्रायव्हर, व्हिडीओ व्हायरल
एफडीसाठी चांगली संधी! सर्व बँका देतायेत भरघोस व्याज; जाणून घ्या किती?
मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा






