निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”

On: November 24, 2024 11:46 AM
sanjay raut said dhananjay chandrachud responsible for results
---Advertisement---

Sanjay Raut | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव मविआ नेत्यांना अजूनही स्वीकार करता येईना, असंच चित्र सध्या दिसून येतंय. राज्यात महायुतीने एकहाती सत्ता काबीज केली आहे.एकट्या भाजपलाच तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. तर, मविआला 50 च्या पुढेही आकडा गाठता आलेला नाही. या सर्व निकालाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आणि अजबच दावा केला आहे. (Sanjay Raut)

संजय राऊत हे आज (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर मोठा आरोप केलाय. ज्या पद्धतीने निकाल लागले, ते संशयास्पद आहेत. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं, असं राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रातील परिस्थितीला धनंजय चंद्रचूड जबाबदार”

तसंच जे काही घडलं त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता?, असा संतप्त सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय.

पुढे ते म्हणाले की, चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं, असा दावाच संजय राऊत यांनी केलाय.

संघाच्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसला- राऊत

“धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला फक्त जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल.”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केलं. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल, असा टोला राऊत यांनी लगावला. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी काय तीर मारला आहे? संघाची भूमिका ही या निवडणुकीत महत्त्वाची राहिली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी विषारी प्रचार केला, त्याचा आम्हाला फटका बसला, असं राऊत यांनी म्हटलं.

News Title – sanjay raut said dhananjay chandrachud responsible for results

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार का?

शिंदेसेना ठरली वरचढ, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करची पोस्ट; म्हणाली, “EVM मध्ये घोटाळा..”

विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने खळबळ

पवार vs पवार सामना झालेल्या ‘त्या’ 40 जागांचा निकाल काय लागला?

Join WhatsApp Group

Join Now