Sanjay Raut | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात काल भव्य सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या नेत्यांमुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे नेते आता भाजपसोबत आहेत, असा पलटवार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.
“ज्या सभेत अशोक चव्हाण हे शाहांच्या बाजूला बसलेले होते. त्याच अशोक चव्हाण यांच्यावर अमित शाह यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ही गोष्ट शाह यांना लक्षात नाही का?”, असा सवाल करत राऊत यांनी टीका केली.
” पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय”
पुढे ते म्हणाले की, “यांच्याच सरकारने शरद पवार यांना सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो, असेही मोदींनी म्हटले होते. मात्र, आता अमित शाह हे शरद पवार यांच्यावर आरोप करत आहेत. म्हणजेच, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालेले दिसत आहे, त्यांच्यात मतभेद झाल्याचं दिसत आहे.”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. काल सभेत फडणवीस यांनी ‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’, असं कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं. यालाच राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मविआच्या लोकांना ठोकून काढा. ही कुठली भाषा आहे?,राज्याचा गृहमंत्रीच गुंडगिरीची आणि ठोकशाहीची भाषा वापरत आहे. फडणवीस यांचा नागपूर विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाच संजय राऊत यांनी केलाय.
“देशाचे गृहमंत्री कसे नसावे याचं उदाहरण अमित शाह”
तसंच पुढे त्यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडले, असं म्हटलं. यामुळे पहिली चौकशी ही फडणवीसांची करायला पाहिजे. यापैकी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले. हे पैसे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी कुठून आणले? याची चौकशी गृहमंत्री अमित शाह यांनी केली पाहिजे, अशी मागणी देखील राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
“अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटतेय. गृहमंत्र्याची भाषा कशी असायला पाहिजे. यापूर्वी लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते त्यांचं वक्तव्य पाहिले पाहिजे. देशाचे गृहमंत्री कसे नसावे याचं उदाहरण अमित शाह आहेत.”, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
News Title – Sanjay Raut reply to Amit Shah Criticism
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात
राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील!
विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला झटका! ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर?
‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश






