‘नक्की कोण कुणाचा आका?’; वाल्मिक कराडचा शिंदे-फडणवीस व अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल

On: December 31, 2024 8:28 AM
Sanjay Raut posted a photo of Walmik Karad
---Advertisement---

Sanjay Raut | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना उलटत आहे. मात्र, अजूनही यातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा थेट आरोप केला जातोय.तसेच वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. मात्र, वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. आता याच वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत मविआच्या बड्या नेत्याने (Sanjay Raut) गंभीर सवाल उपस्थित केलाय.

संजय राऊत यांचं ट्वीट काय?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी एक ट्वीट केलं असून या ट्वीटची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याबरोबरच त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार राऊत यांनी वाल्मिक कराड याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) पोस्ट केलाय.

तसेच, “व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?”, असं कॅप्शन या फोटोला दिलंय. संजय राऊत यांनी ही पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टॅग केली आहे. राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केलेल्या फोटोवर काही मजकूर देखील दिसून येतोय. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक?”, असा मजकूर या फोटोवर दिसून येतोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे गेला आहे. याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय. (Santosh Deshmukh Murder Case)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी त्यांची नावे आहेत. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार आहेत. (Sanjay Raut)

News Title :  Sanjay Raut posted a photo of Walmik Karad

महत्त्वाच्या बातम्या-

वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी या’ राशींवर करणार धनवर्षाव!

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, नागरिकांच्या आरोग्यासाठी BMC उचलणार कठोर पाऊल

फरार वाल्मिक कराड उज्जैन महाकालच्या दर्शनाला?; ‘ते’ फोटो समोर

मारहाणीचे व्हिडिओ, राजकीय नेत्यांना कॉल; सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदाराचा भीषण अपघात

Join WhatsApp Group

Join Now