संजय राऊत कडाडले! पहिली प्रतिक्रिया समोर

On: September 26, 2024 2:48 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे. अशातच आता न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया :

यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यात युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याचे काम मिळाले होते. मात्र त्या कामात भ्रष्टाचार किंवा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप मी केलेला नाही. हा आरोप सर्वात पहिल्यांदा मीरा-भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र देखील दिले आहे. त्यावर मीरा-भाईंदर महापालिकेचा कामामध्ये गडबड असल्याचा एक अहवाल देखील सादर केला आहे.

त्यानंतर तेथील आमदार प्रताप सरनाईक त्यांनी महाराष्ट्र सरकारला या घोटाळ्यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलेले आहे आणि यासंदर्भात चौकशीची मागणी देखील केलेली आहे. तसेच विधानसभेत याबाबत प्रश्न देखील विचारले गेले आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत आदेश पारित करण्यात आला आहे.

Sanjay Raut l पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे शिक्षा ठोठावली तरी… :

या संपूर्ण घटनेत मी केवळ लोकांसमोर हा मुद्दा आणला. तसेच मी केवळ हे प्रश्न विचारले. मग या प्रकरणामध्ये मी अब्रुनुकसान कुठे केली? मग पहिले अब्रुनुकसान ही मीरा-भाईंदर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केली आहे. तर दुसरी मीरा-भाईंदर नगरपालिकेने व तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत मी केली आहे.

पण मी सार्वजनिक हितासाठी आणि जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे असे मला दिसल्यावर मी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे. तसेच आज मला पंधरा दिवसांची शिक्षा कोर्टाने ठोठावण्यात आली आहे. त्यांनी मला पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे जरी शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलण्याचे कधीही थांबवणार नाही. तसेच आम्ही आता वरच्या कोर्टात अपील करत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

News Title – Sanjay Raut On Medha Somaiya

महत्वाच्या बातम्या- 

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मोठी बातमी! संजय राऊत ‘त्या’ प्रकरणी दोषी, मिळाली तुरुंगवासाची शिक्षा

नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, दिलं हे कारण!

अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now