तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले; राऊतांचा सरकारवर निशाणा

On: January 7, 2025 11:00 AM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारून सत्ता स्थापन केली. मात्र निवडणूक काळात महायुतीची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या योजनेतंर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र आता सरकारकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरुन 2100 रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र यासंदर्भात ठाकरे गटाच्या मुखपत्रामधून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारवर शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला :

निवडणुकीच्या काळात महायुतीने जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिल होत. मात्र लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त बोजा हा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. “लाडक्या बहिणींपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तसेच तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे”, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी घणाघात केला आहे.

Sanjay Raut l तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले :

दरम्यान, “राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे प्रचंड मोठे अपयश आहे. मात्र तुम्ही त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? तसेच ‘कॅग’ने देखील ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग महायुती सरकारने थांबवा!”

“याशिवाय राज्यातील लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर राज्यातील शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे आधी बंद करा! तसेच घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आला आहेत हे मात्र खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे अवघ्या काही महिन्यांतच फाटले आहेत. त्यामुळे तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या देखील लक्षात आले आहे”, असे संजय राऊत यांनी मुखपत्रकात नमूद केले आहे.

News Title : Sanjay raut on mahayuti goverment

महत्वाच्या बातम्या –

अलर्ट! महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, ‘या’ ठिकाणी आढळले रुग्ण

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती?, पाहा संपूर्ण लिस्ट

आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?

’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now