मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर

On: November 21, 2024 11:43 AM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l राज्यात विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अशातच आता महाराष्ट्रातील अनेक एक्झिट पोल देखील समोर आले आहे. मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चूरस असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता या एक्झिट पोलवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आत्तापर्यंत कोणते पोल खरे ठरले? :

संजय राऊत म्हणाले, एक्झिट पोल हा फ्रॉड आहे. कारण हरियाणामध्ये काँग्रेस 60च्या वर जागा येईल असा पोल होता, परंतु नेमकं काय झालं ते आपण पाहिलं. तसेच लोकसभा निवडणुकीत देखील 400 पारचे पोल होते, मात्र त्यावेळी देखील पण काय झालं ते आपण पाहिलं. त्यामुळे नागरिकांनी मतदान केलं आहे, मात्र ते गुप्त असते.

तसेच राज्यात महाविकास आघाडी 26 तारखेला सत्ता स्थापन करेल. तर 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागेल. यावेळी महाविकास आघाडीला 160 पेक्षा जास्त जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी 23 तारखेला सत्तेवर दावा करू शकते. त्यामुळे एक्झिट पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये, आत्तापर्यंत कोणते पोल खरे ठरले आहेत? असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut l पुढील मुख्यमंत्री कोण? :

संजय राऊत पुढे म्हणाले, सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात येतील की फक्त कुलूप हाती येतं, हे मात्र येत्या 72 तासांमध्येच ठरेल. तसेच महायुतीने मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडला, मात्र आम्हाला खात्री आहे, जनतेने पैशाच्या प्रवादान वाहून न जाता मतदान केलं आहे.

येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मी साडे दहा ते अकरा वाजता सांगेन महाविकास आघाडीचा कोणता मुख्यमंत्री असेन असंदेखील भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

News Title – Sanjay Raut on Maharashtra Exit Poll

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ गोष्टींमुळे सरकार आमचंच येणार; भुजबळांना अतिविश्वास

राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, मनसेबाबत काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?

“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर

विधानसभेत जरांगे फॅक्टर ठरणार फेल?, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now