धनंजय मुंडेंवर अन्याय का? मविआच्या नेत्याचा सवाल

On: January 15, 2025 1:01 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी कामकाजासंदर्भात संवाद साधणार आहेत. मात्र मुंबईतील या कार्यक्रमापासून मंत्री धनंजय मुंडे यांना दुर ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले? :

खासदार संजय राऊत म्हणाले की, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही. पण उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी मोठे आरोप केले आहेत. याशिवाय असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी आरोप केले होते. मग त्यांना पण मोदींच्या दौऱ्यापासून दूर ठेवणार का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय “उपमुख्यमंत्री अजित पवारांवर दोन दिवसांपूर्वी 70 हजार कोटीचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. याशिवाय ते अशोक चव्हाणावर देखील आरोप करतात, मग मंत्री धनंजय मुंडेवर अन्याय का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

Dhananjay Munde l आकाच्या आकावर कारवाई कधी होणार? :

दरम्यान, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. याप्रकरणी संजय राऊत म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत काहीही करून फायदा नाही. कारण ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून महायुतीच्या मंत्रिमंडळात आहेत, तसेच आकाच्या आकावर कारवाई कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

याशिवाय “चारित्र्य म्हणजे काय हे आम्हाला वर जाऊन धर्म राजाला विचारावे लागेल, तसेच भगवद गीता बघावी लागेल, श्रीकृष्णाने अर्जुनाला अशी कोणती चारित्र्याची व्याख्या सांगितली आहेत का हे देखील बघावे लागेल”, असे राऊत म्हणाले आहेत.

News Title : Sanjay Raut On Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या-

पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now