“कुठल्या गोधडीत मुतत होता?”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला

On: October 1, 2025 1:14 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Ekanth Shinde) जिव्हारी लागणारे वार केले.

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत केले वक्तव्य :

राऊत म्हणाले – “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची स्थापना गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा असे मुहूर्त पाहून केली नव्हती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) युतीची घोषणा करतील, तोच खरी साडेचारचा मुहूर्त असेल.”

“दसऱ्याला फक्त दोनच मेळावे महत्वाचे आहेत – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. बाकी इतर मेळाव्यांना तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे.”

राऊतांनी मोदी-शहांवर थेट हल्ला चढवला :

यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “ चोर बाजारात माल विकायचा असतो, दिल्लीतही चोर बाजार आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे. तिथे त्यांनी राजकारणातला चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग (Election Comission) आणि भाजप (BJP) सोडले तर दुसरे लोक त्यांना शिवसेना मानत नाही. आतून मानावं लागतं.”

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर टीका :

“प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातील. अरे, तुम्ही कोण? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होता? कुठल्या गोधडीत मुतत होता? जर वाटत असेल की तुम्हीच शिवसेना स्थापन केली, तर जन्माचे दाखले घेऊन या.”

पुढे ते म्हणाले , “एकनाथ शिंदे रोज सकाळी स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात. पण बाळासाहेब कधीच दिल्लीच्या चरणी झुकले नाहीत. निर्णय घ्यायला कधीच मोदी-शहांच्या दारात उभे राहिले नाहीत. शिंदेंचा पक्ष म्हणजे नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. मी त्याला पक्ष मानत नाही. पावसाळ्यात जशी गांडुळे निर्माण होतात, तशीच त्यांची अवस्था आहे. मोदी-शहा आहेत तोवर ते राहतील, नंतर पावसाळ्यातील गांडुळांसारखे संपतील.”

शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चिघळला :

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांचा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) त्यांचा दसरा मेळावा पार पडत असे. पण यावर्षी दसऱ्याच्या दिवशी पाऊस सांगितल्याने शिंदे यांनी त्यांचे ठिकाण बदलण्याचे ठरवले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवाजी पार्क (शिवतीर्थ) वरच दसरा मेळावा घेण्याचे ठरवले आहे. राऊतांच्या या तीव्र हल्ल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे.

News Title :- Sanjay Raut launches blistering attack on Eknath Shinde

Join WhatsApp Group

Join Now