Sanjay Raut l शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात शिवसेना संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात तब्बल 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांना दिलासा मिळाला आहे.
संजय राऊतांना जामीन मंजूर :
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्या प्रकरणी संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र आता संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाला आहे. तसेच 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून यासंदर्भात दाद मागण्याची मुभा देखील कोर्टाकडून देण्यात आली आहे.
Sanjay Raut l नेमकं प्रकरण काय? :
मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहे. मात्र त्यापैकी 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होते. त्यावेळी बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची मोठी फसवणूक केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
मात्र आज या प्रकरणाच्या सुनावणी झाली. यामध्ये संजय राऊत यांना तब्बल कोर्टाने 15 दिवसांची शिक्षा सुनावली होती. तसेच मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान देखील दिलं होतं. मात्र आता संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
News Title – Pre arrest bail granted to Sanjay Raut in Defamation case
महत्वाच्या बातम्या-
लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!
संजय राऊत कडाडले! पहिली प्रतिक्रिया समोर
ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मोठी बातमी! संजय राऊत ‘त्या’ प्रकरणी दोषी, मिळाली तुरुंगवासाची शिक्षा
नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!






