Sanjay Raut | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणातून तात्पुरती विश्रांती घेतली आहे. प्रकृतीतील गंभीर बिघाडामुळे ते दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. त्यांनी स्वतः पत्र लिहून ही माहिती दिली असून, नवीन वर्षात परत येण्याचे संकेत दिले आहेत.
प्रकृती बिघाडामुळे दोन महिन्यांची विश्रांती :
शिवसेना (Shiv Sena) (UBT) पक्षाची ‘मुलुखमैदानी तोफ’ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडत असत. मात्र, आता त्यांनी स्वतःच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी एक पत्र लिहून आपण सार्वजनिक जीवनातून दोन महिने दूर राहत असल्याचे जाहीर केले आहे.
राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे.” डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना बाहेर जाण्यावर आणि गर्दीत मिसळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. उपचार सुरू असून, लवकरच बरे होऊन नवीन वर्षात पुन्हा सक्रिय होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Raut | कार्यकर्त्यांना चिंता: नेमके झाले काय? :
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे पत्र आपल्या एक्स (X) (पूर्वीचे ट्विटर) (Twitter) हँडलवरून पोस्ट केले आहे. “सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती” या शीर्षकाखाली त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.”
मात्र, त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल ‘गंभीर बिघाड’ एवढाच उल्लेख केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांना नेमके काय झाले आहे, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी ‘लवकर बरे व्हा’ अशा कमेंट्स करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.






