“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले

On: November 7, 2024 12:53 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असं सदाभाऊ म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे चांगलेच संतापले आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. (Sanjay Raut )

“फडणवीस फिदीफिदी हसत होते, टाळ्या..”

“खोत यांनी पहिलं आपला चेहरा बघावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. मोदींनी बारामतीत जाऊन पवार हे आपले कसे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे? हे वारंवार सांगितलं आहे. पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं.भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यांचा इतक्या वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहावा आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं, याचं देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं,” असा टोला राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला आहे.

तसंच, पुढे त्यांनी फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले आहे. म्हणून आम्हाला या राज्यातील सत्ता बदलायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असंही राऊत म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी बँका हाणल्या आहेत. तसेच कारखाना देखील हाणाला आहे, पण आता शरद पवारांनी येवढं हाणलं तरी ते भाषणात म्हणतात की, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. तसेच मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा? आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा खोचक सवाल करत सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

दरम्यान, सगळीकडून टीका होत असल्याचे दिसताच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. “कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. (Sanjay Raut )

News Title – Sanjay Raut Criticism on sadabhau khot

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर

शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

दरवाढीचं सत्र सुरूच, सोनं पुन्हा महागलं; जाणून घ्या आजच्या किमती

‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा

Join WhatsApp Group

Join Now