Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने विशेष जीआर काढला आणि त्यावरून ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, अशी भूमिका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली. भुजबळांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भुजबळांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“कोर्टात जाणं हा भुजबळांचा अधिकार” :
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “छगन भुजबळ कोर्टात जात असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मराठा असो वा ओबीसी, आम्ही सगळ्यांना मराठी माणूस म्हणून पाहतो. आमची भूमिका नेहमीच मराठी माणसांची एकजूट निर्माण करण्याची राहिली आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, जातीय भेद न करता प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, मात्र सध्या या प्रश्नाचा राजकीय गैरफायदा घेतला जात असल्याचं दिसतं.
Chhagan Bhujbal | मोदींवर थेट आरोप :
संजय राऊत यांनी यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलं –
“छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे फक्त प्यादे म्हणून वापरले गेले. त्यांना मंत्री अजित पवारांनी नाही, तर नरेंद्र मोदींनी केले. मोदी स्वतःला ओबीसींचा नेता मानतात, म्हणूनच त्यांनी विशेष जीआर काढून भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं.”
राऊतांनी सवाल केला की, “कोणत्या पंतप्रधानाने कधी स्वतःची जात जाहीर केली आहे? पण मोदींनी ‘मी ओबीसी आहे’ असं सांगत राजकारण केलं आणि जातीय फूट पाडली.”
मराठी एकतेवर ठाम भूमिका :
राऊत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालतो. जाती-धर्माचे भेद न करता मराठी माणसाला एकत्र आणणं हाच आमचा उद्देश आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत मोदी आणि फडणवीस यांनी देशात जातीय व धार्मिक फूट निर्माण केली.”






