भाजपा म्हणजे नटरंगी नार, ‘या’ नेत्याची जहरी टीका

On: December 20, 2024 12:10 PM
BJP
---Advertisement---

BJP l केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यावरून संसदेच्या पायऱ्यावर काल आंदोलन झाले आहे. मात्र त्या आंदोलनाला देखील गालबोट लागले आहेत. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊतांनी दिली तिखट प्रतिक्रिया :

संसदेच्या पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर धक्का-बुक्कीचा आरोप लावला आहे. मात्र एखाद्या गल्लीतील भांडणासारखा हा प्रकार उभ्या देशानेच नाही तर अवघ्या जगाने पाहिलं असल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच संसदेबाहेरील महाभारतावर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका केली आहे. तसेच राऊतांनी भाजप पक्षावर देखील तुफान शेरेबाजी केली आहे. यावेळी राऊत यांनी ही भाजपाची नौटंकी असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, खासदार सारंगी हे किती नाटकबाज आहेत, हे वेगळं सांगायची आता कोणाला गरज आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ते ढोंगी असल्याचा पलटवार देखील संजय राऊतांनी केला आहे. याशिवाय भाजपा किती आंबेडकरवादी आहे हे दिसून आल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच भाजपाने नाटक वाढवल्याचा आरोप त्यांनी केला. तर भाजपा ही नटरंगी नार असल्याची तिखट प्रतिक्रिया संजय राऊत दिली आहे.

BJP l नेमकं काय घडलं? :

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले होते. हा संपूर्ण वाद त्यावरूनच सुरु निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यावरून आरोपांची प्रचंड राळ उडाली. मात्र त्याला प्रत्युत्तर भाजपा खासदारांनी काँग्रेस दुटप्पी असल्याचा आणि त्यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे.

मात्र काल सकाळी नवीन संसद भवनाच्या इमारतीत भाजपा निषेध आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी सभागृहात केला आहे. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला आहे. तो आपल्या अंगावर पडला आणि डोक्याला जखम झाल्याचा आरोप देखील सारंगी यांनी केला होता. परंतु, हा मुद्दा आता गुन्हा नोंदवण्यापर्यंत वाढला आहे.

News Title: Sanjay Raut Attack on BJP

महत्त्वाच्या बातम्या –

महागाईचा झटका बसणार? ‘या’ वस्तू महागणार

“जास्त हुशार्‍या मारू नका, मी पुन्हा येईन”; शिंदेंच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण

मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक

“मराठी माणसं भिकारी, तुमचं मराठीपण काढतोच”; म्हणत हिंदी भाषिक अधिकाऱ्याकडून मारहाण, नेमकं काय घडलं?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now