“संजय राठोडांचा काळा डाग शिंदेंच्या कपाळी”; नव्या बॅनरची जोरदार चर्चा

On: December 20, 2024 11:36 AM
Sanjay Rathod against Banners in Pune
---Advertisement---

Sanjay Rathod | रविवारी 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नागपूर येथे पार पडला. यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटातून आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रीपद देण्यावरून भाजपा विरोध करत होती. मात्र, तरीही त्यांना संधी देण्यात आली. याची बरीच चर्चा झाली.

यानंतर आता पुण्यात लागलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पुण्यात संजय राठोड यांच्या विरोधात बॅनर झळकले आहेत. या बॅनरची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. ‘राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी’ अशा आशयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. त्यावर मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती क्रॉसफुली मारून निषेध करण्यात आलाय.

पुण्यातील बॅनरची जोरदार चर्चा

एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रीपद, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय.मात्र, सदर बॅनर नेमके कुणी लावले याची कोणतीच माहिती समोर आली नाही. या बॅनरवर तसे नाव देखील दिसून आले नाही. रस्त्याच्या अगदी मधोमध हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात याची एकच चर्चा रंगली आहे.

महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना संधी दिली नाही. त्यांचे नाव यंदाच्या मंत्रीमंडळातून कट झाले. सत्तार, तानाजी सावंत यांच्याबरोबर संजय राठोड यांच्या नावाला भाजपकडून विरोध करण्यात आल्याचं बोललं जातं. मात्र, तरीही राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रीपद मिळालं.

संजय राठोड यांच्या विरोधात बॅनर

संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. हे गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आले होते. त्यावेळी भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. सध्या शिवसेना भाजपासोबत सत्तेत सामील आहे. त्यातच राठोड यांना मंत्रीपद देखील मिळालं. अशातच पुण्यात हे बॅनर झळकले आहेत. आता हे बॅनर नेमके लावले कुणी?, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड (Sanjay Rathod) हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांना 143,115 मतं मिळाली. यापूर्वी त्यांनी 2004, 2009, 2014, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील विजय प्राप्त केलाय.

News Title :  Sanjay Rathod against Banners in Pune

महत्वाच्या बातम्या –

“जास्त हुशार्‍या मारू नका, मी पुन्हा येईन”; शिंदेंच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण

मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक

“मराठी माणसं भिकारी, तुमचं मराठीपण काढतोच”; म्हणत हिंदी भाषिक अधिकाऱ्याकडून मारहाण, नेमकं काय घडलं?

आज ‘या’ राशींवर असणार स्वामींची विशेष कृपा!

Join WhatsApp Group

Join Now