सानिया मिर्झाने लिहले ‘लव्ह लेटर’! कोणासाठी व्यक्त केल्या भावना?

On: March 6, 2025 5:40 PM
Sania Mirza
---Advertisement---

Sania Mirza l माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आपल्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) पासून घटस्फोट घेतल्यानंतर ती आणखीनच चर्चेत आली. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सानियाने लिहिलं ‘लव्ह लेटर’, कोणासाठी? :

सानियाने आपल्या पोस्टला ‘लव्ह लेटर’ असं नाव दिलं आहे. मात्र, सानियाने हे ‘लव्ह लेटर’ कोणत्या व्यक्तीसाठी नाही तर, एथलिट्ससाठी लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने खेळाडूंना भेडसावणाऱ्या संघर्षांवर भाष्य केलं आहे.

सानिया म्हणते, “स्वप्नांचा नेहमी विचार करा, तुमच्या पॅशनचा पाठलाग करा… ज्यामुळे पैसा, प्रवास आणि लोकप्रियता मिळेल. पण खेळाला केवळ खेळ म्हणून ठेवणं कठीण असतं. अनेकदा एकटं वाटतं, आणि जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा विशेष लक्ष केंद्रित करावं लागतं.”

पुढे ती म्हणते, “खेळाडूंना आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. एकवेळ अशी येते, जेव्हा त्यांना ना पैसा हवा असतो, ना पुरस्कार, त्यांना फक्त लोकांचं प्रेम हवं असतं. हा प्रवास अवघड असतो, पण तोच खेळाडूचं आयुष्य घडवतो.”

Sania Mirza l सायना नेहवालच्या नवऱ्याचीही प्रतिक्रिया :

सानियाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट परुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap), जो बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) यांचा नवरा आहे, यानेही फायर इमोजी टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सानियाच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेमाचा वर्षाव केला असून, खेळाडूंच्या संघर्षावर तिने मार्मिक भाष्य केल्याचे म्हटले जात आहे.

News title :Sania Mirza’s Emotional ‘Love Letter’ to Athletes Goes Viral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now