शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला

On: January 17, 2025 11:45 AM
Sangli News Sarja the Bull Saves Owners Life After Paralysis Attack
---Advertisement---

Sangli News |  माणुसकीलाही लाजवेल अशा या जगात, एका मुक्या जनावराने आपल्या मालकाप्रती दाखवलेले प्रेम आणि निष्ठा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मांगले (ता. शिराळा) येथील संभाजी तडाखे (वय ६५) हे आपल्या सर्जा (Sarja) नावाच्या बैलासोबत (Bull) शेतात वैरण आणण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातच अर्धांगवायूचा झटका आला. मात्र, सर्जाने दाखवलेल्या असामान्य सतर्कतेमुळे संभाजी तडाखे यांचा जीव वाचला. (Sangli News)

संभाजी तडाखे हे आपल्या सर्जा बैल आणि एक्क्यावरून (Ekkya) वैरण आणण्यासाठी चार किलोमीटरवरील बांबराच्या डोंगरावर गेले होते. शेतात काम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा एक हात आणि एक पाय जड झाल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी ‘सर्जाऽऽऽ’ अशी बैलाला हाक दिली आणि सर्जा क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्याजवळ आला.

नेहमीपेक्षा वेगळी हाक सर्जाच्या काळजाला भिडली

संभाजी तडाखे यांना बोलताही येत नव्हते. त्यांनी अर्धवट उचललेले जू (Yoke) स्वतःहून वाकून आपल्या खांद्यावर घेतले आणि कसेबसे एक्क्यात बसले. “सर्जा, घराकडे चल,” अशी पुसटशी साद त्यांनी सर्जाला घातली. मालकाची नेहमीपेक्षा वेगळी असलेली हाक सर्जाच्या काळजाला भिडली असावी. त्याने क्षणाचाही विलंब न लावता, जूची सापती (Rope) गळ्याला न लावता, तशाच अवस्थेत संभाजी तडाखे यांना घेऊन घराच्या दिशेने धाव घेतली. (Sangli News)

हंबरडा फोडून सर्जाने कळवला मालकाचा त्रास

चार किलोमीटरचा रस्ता पार करून सर्जा संभाजी तडाखे यांना घेऊन घरी पोहोचला. घरी पोहोचताच त्याने हंबरडा (Bellow) फोडला. त्याचा आवाज ऐकून घरातील मंडळी बाहेर धावत आली. त्यांनी संभाजी तडाखे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Sangli News)

उपचारानंतर घरी आलेल्या संभाजी तडाखे यांना, “मुक्या जनावराच्या या सतर्कतेमुळे मला जीवदान मिळाले,” असे उपस्थितांना सांगताना अश्रू अनावर होत होते. सर्जाच्या या असामान्य कार्यामुळे माणूस आणि मुक्या जीवाच्या सहजीवनाचे एक अनोखे दर्शन उपस्थितांना घडले.

Title: Sangli News Sarja the Bull Saves Owners Life After Paralysis Attack

महत्वाच्या बातम्या- 

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘मी खूप रडले….’; ‘त्या’ व्हायरल किसींग सीनबाबत प्रिया बापट पहिल्यांदाच बोलली

हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती

अपघात झाल्यास कंत्राटदारांची खैर नाही…; नितीन गडकरी मोठा निर्णय घेणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ

Join WhatsApp Group

Join Now