Sandhya Shantaram Death | मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘पिंजरा’, ‘दो आंखें बारह हाथ’ असे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या शांताराम यांनी वयाच्या ९४ च्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री उशिरा राजकमल स्टुडिओमध्ये संध्या यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पिंजरा चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’ हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते.
संध्या शांताराम यांची कारकीर्द :
संध्या शांताराम यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३८ साली झाला. १९५९-६० च्या दशकात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. व्ही.शांताराम यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. सध्या या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्यासाठीही ओळखल्या जात होत्या. (Sandhya Shantaram Death)
झनक झनक पायल बाजे या सिनेमात ‘अरे जा हट नटखट’ या गाण्यात त्यांनी प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक गोपीकृष्ण महाराज यांच्याबरोबर केलेलं नृत्य सादरीकरण विशेष लोकप्रिय झालं होतं. स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा साकारून त्यांनी त्या गाण्यात नृत्य केलं. ते गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. संध्या यांना त्यांच्या ‘पिंजरा’ या सिनेमासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ‘चंदनाची चोळी अंग जाळी’ या मराठी सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
Sandhya Shantaram Death | मंत्री आशिष शेलार यांच्याकडून श्रद्धांजली :
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी X वर पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे, “भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !” ( Sandhya shantaram Death)






