“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

On: December 19, 2024 12:42 PM
Sandeep Kshirsagar on santosh deshmukh murder case
---Advertisement---

Sandeep Kshirsagar | राज्यातील बीड जिल्ह्यात सध्या भयानक वस्तुस्थिती निर्माण झाल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे बीड चर्चेत आहे.त्यातच येथे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी भाषणात बीडमधील भयानक परिस्थिती वर्णन केली.

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. याचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी या प्रकरणावर चर्चेची मागणी करत सभात्याग केला.तर, आज बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली.

नेमकं काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

“संतोष देशमुख यांना गाडी अडवून जेव्हा उचलून नेलं, तेव्हा त्यांचा सहकारी सोबत होता. तो सहकारी पोलीस स्थानकात वारंवार सांगत होता की सरपंचांना उचलून नेलं आहे आणि त्यांचा जीव धोक्यात आहे, तेव्हा पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दोन-तीन तासांनंतर म्हणजे त्या सरपंचाची हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केली.”, असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.

“या सर्व प्रकरणामधील आरोपीचे नाव वाल्मिक कराड असून त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघितले, तर पूर्ण प्रकरण उघड होईल. वाल्मिक कराडमुळेच बीडमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालं आहे. कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी लावलीच पाहिजे”, अशी मागणी आमदार क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केली.

“…तर बीडमध्ये काय होईल, सांगता येत नाही”

“302 च्या गुन्ह्यातला मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. अधिवेशन संपण्याआधी वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. हे लोक इतर सगळे गैरप्रकार करण्यात तरबेज आहेत. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅकवर निकाल लागायला हवा”, असंही पुढे क्षीरसागर म्हणाले.

या वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही. लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल. जर या विषयात आपण प्रामाणिकपणे लक्ष घातलं नाही तर परिस्थिती अशी आहे की, साधेसाधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज पाहिला जातो. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला, तर त्याच्या नावापेक्षा आडनाव काय हे पाहिलं जातं, हे जातीपातीचं विष जिल्ह्यात पेरत आहे, असं क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले.

News Title –  Sandeep Kshirsagar on santosh deshmukh murder case

महत्त्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली!

स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?

Join WhatsApp Group

Join Now