पुणेकरांसाठी मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार

On: September 9, 2024 2:28 PM
Samruddhi Mahamarg
---Advertisement---

Samruddhi Mahamarg l पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठं पार पडली. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता समृद्धी महामार्ग हा पुण्याला जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Samruddhi Mahamarg Connect To Pune)

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार :

पुण्याजवळ असलेल्या केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी तब्बल 7515 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे – शिरूर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे .

तसेच हा प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यासाठी आणखी तब्बल 2050 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून एकूण खर्च हा 9565 रुपये इतका येणार आहे. तसेच या महामार्गाची एकूण लांबी ही 250 किलोमीटर इतकी असणार आहे .

Samruddhi Mahamarg l राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय :

पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव हा बांधकाम विभागाने राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र आता त्या प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते.

तसेच पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग यापूर्वी ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार होता. त्यावेळी त्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता एप्रिल महिन्यादरम्यान हा महामार्ग ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआयडीसी’ यांच्यात झालेल्या करारानुसार ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्या प्रकल्पावर ‘एमएसआयडीसी’ मार्फत काम करण्यात येणार आहे.

News Title – Samruddhi Mahamarg Connect To Pune

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

मनोज जरांगेंच्या विरोधात ‘या’ मराठा नेत्याचे आंदोलन, विचारली या प्रश्नांची उत्तरे

“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी

शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

संतापजनक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये टाकून अज्ञात पालक पसार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now