शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?

On: September 26, 2024 5:40 PM
Sambhajiraje Chhatrpati
---Advertisement---

Sambhajiraje chhatrapati l राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. मात्र या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत आहे, तर दुसरा गट हा विरोधात आहे. मात्र अशातच आता आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या दोन पक्षांचे चार पक्षांमध्ये रुपांतर झाल्याची ही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच वेळ आहे. मात्र असं असताना देखील सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र :

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होत आहे. यामध्ये स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांची मुंबईत बैठक झाली. तसेच आपण नावीन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा देखील प्रयत्न करू अशी चर्चा झाली आहे. तसेच ही चर्चा सुरु असताना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तेव्हा आपण वेगळा महाराष्ट्रासाठी घडवू शकतो असे समजले आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

Sambhajiraje chhatrapati l संभाजीराजे छत्रपती नेमकं काय म्हणाले? :

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी पक्ष यामुळे मी गोंधळून गेलो आहे. तसेच गावं हे दोन नावांचे असतात,त्याप्रमाणे राष्ट्रवादी खुर्द कोण आहेत? आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण आहेत? याशिवाय शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण आहेत? हे का जनतेच्या हितासाठी झाले आहेत का? तसेच तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला अशी घणाघाती टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

“तसेच आता माझं चॅलेंज आहे की, तुम्ही किल्ल्यांसाठी किती पैसे दिले हे देखील सांगा. 75 वर्षात फक्त 1 कोटी खर्च करण्यात आला आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे अशा रोखठोक शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

News Title –  Sambhajiraje chhatrapati slams on maharashtra political situation

महत्वाच्या बातम्या- 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना सर्वात मोठा दिलासा!

लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

संजय राऊत कडाडले! पहिली प्रतिक्रिया समोर

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मोठी बातमी! संजय राऊत ‘त्या’ प्रकरणी दोषी, मिळाली तुरुंगवासाची शिक्षा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now