वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!

On: December 31, 2024 4:24 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता गेल्या 22 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराडने अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. या प्रकरणावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी देखील शंका उपस्थित केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला संशय :

याप्रकरणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मोर्चा झाला. तसेच वाल्मिक कराड यांना पकडण्यात सीआयडी पोलिसांना देखील यश मिळालं नाही, तसेच थोडं फार सरकारवर जे आम्ही दबाव टाकला होता, त्यातूनच वाल्मिक कराडवर हा मानसिक दबाव आला असल्याची शक्यता आहे. तसेच आरोपी वाल्मिक कराड तब्बल 22 दिवस बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोट येथे जाऊन दर्शन देखील घेतो, पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल सुद्धा होतो” असे प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केले आहेत.

याशिवाय काल मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात हजर होतो हा मात्र संशोधनाचा भाग आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच वाल्मिक कराड हा आज शरण आल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Walmik Karad l वाल्मीक कराडवर अद्याप खूनाचा गुन्हा दाखल झालेला नाही :

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने तब्बल 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा तो बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मिक कराडला केवळ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्यावर अद्यापही खूनाचा गुन्हा दाखल झालेला नाही.

मात्र वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्याच्यावर मोक्का देखील लागणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावणार का याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, असे देखील संभाजीराजेंनी म्हटले आहे.

News Title : sambhajiraje chhatrapati on walmik karad

महत्त्वाच्या बातम्या-

“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर

बंदोबस्त कमी, शरण येण्याची शक्यता नाही?… तोच पांढऱ्या स्कॉर्पिओतून कराडची एन्ट्री… नेमकं काय घडलं?

सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड कुठे होता? कार्यकर्त्यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मिक कराडसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…

‘धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड एकाच….’, भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now