पुणेः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रथाचे सारथ्य केले. यावेळी दर्शनासाठी रेटारेटी झाली तसेच गोंधळ उडाल्याने “भिडे गुरुजींमुळे पालखी सोहळ्यात राडा” झाल्याची बातमी थोडक्यातकडून प्रसारित केली गेली. वास्तविकपणे त्यावेळी उडालेली गोंधळ आणि झालेली गर्दी ही भिडे गुरुजी यांना रोखण्यासाठी नव्हती तर दर्शनासाठी झालेली होती. मात्र यामुळे अनावधानाने याबद्दल बातमी प्रसारित करण्यात आली.
सदर बातमी थोडक्यातने आपल्या सर्व प्लॅटफॅार्म्सवरुन तात्काळ हटवली आहे. या बातमीमुळे भिडे गुरुजी तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल ‘थोडक्यात’कडून दिलगीरी व्यक्त करत आहोत.
दरम्यान, यासंदर्भात थोडक्यातला श्रीशिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानचे निवेदन प्राप्त झाले. श्रीशिवप्रतिष्ठानचा भक्ती शक्ती अर्थात धारकरी आणि वारकरी संगम हा उपक्रम एक महत्त्वाचा उपक्रम आहे. तो दरवर्षी भक्तिभावाने होत असतो. मात्र अशा प्रकारच्या बातम्यांमुळे या उपक्रमाची नाहक बदनामी होते, अशी भावना श्रीशिवप्रतिष्ठानचे पुणे शहर प्रमुख आदित्य मांजरे यांनी व्यक्त केली आहे.






