IPL 2025 l आयपीएल 2025 च्या 20व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत करत 10 वर्षांनंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या अर्धशतकांनी फलंदाजीत वर्चस्व गाजवलं, तर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीत कमाल केली. मात्र, संपूर्ण सामन्यात सगळ्यात लक्ष वेधणारा क्षण ठरला तो म्हणजे फिलिप सॉल्ट आणि टिम डेव्हिडचा सीमारेषेवरील अविश्वसनीय झेल!
शेवटच्या षटकात सस्पेन्स :
मुंबई इंडियन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. गोलंदाजीसाठी आलेल्या कृणाल पांड्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन बळी घेतले.
IPL 2025 l पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनरला झेलबाद केलं :
दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट सीमारेषेकडे गेला आणि तिथे सॉल्ट-डेव्हिडने अफलातून समन्वयाने एक चमत्कारी झेल घेतला. या झेलमुळे चाहत्यांना जणू सामन्यातील सर्वोत्तम क्षण अनुभवायला मिळाला.
व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव :
हा झेल पाहून सोशल मीडियावर युजर्सनी अक्षरशः टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
PHIL SALT PULLED OFF SOMETHING INCREDIBLE AT WANKHEDE. ????pic.twitter.com/dnVCaAiYZr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2025
“हॉटस्टारने हा झेल 10 वेळा रिपीट करावा!”
“हे झेल आहे की जादू?”
“सॉल्ट आणि डेव्हिडचा हा झेल आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम पैकी एक!”
अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत. काहींनी तर हा झेल “Match Winner Moment” म्हणून घोषित केला आहे.
क्षेत्ररक्षणाने जिंकला सामना :
या सामन्यात RCB ने फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही बाजी मारली. डेथ ओव्हर्समध्ये तब्बल 5 अप्रतिम झेल घेतले, ज्याने मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावत 56 धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूंमध्ये 42 धावा ठोकल्या. पण शेवटच्या काही क्षणांत RCBने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवत हा विजय साकारला.






