Salim Khan | सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांचीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणापासून सलमान खान देखील चर्चेत आला आहे. सलमानला लॉरेन्श बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. (Salim Khan)
मागे सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.आता त्याला पुन्हा धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण खान कुटुंब या परिस्थितीमुळे चिंतेत आहे. अशात सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये सलीम खान यांनी मोठं भाष्य केलं.
काय म्हणाले सलीम खान?
“सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही, त्यामुळे तो माफी मागणार नाही. सलमानला मिळणाऱ्या धमक्या या फक्त खंडणीसाठी आहेत. त्यामुळे तो माफी मागणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका सलीम खान यांनी घेतली आहे.
“सलमानने कधी साधं झुरळ देखील मारलेलं नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही.त्याने कोणत्याही प्राण्याची शिकार केली नाही.”, असं सलीम खान म्हणाले आहेत. “लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही जमिनीकडे बघून चालता, तुम्ही खूप सभ्य व्यक्ती आहात. मी त्यांना सांगतो की ही शालीनतेची बाब नाही, मला नेहमी भिती वाटते की, माझ्या पायाखाली एखादा किडा येईल. त्यामुळे मी त्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतो.”,असंही सलीम खान (Salim Khan) म्हणाले.
“सलमानने कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही”
तसेच पुढे ते म्हणाले की, “सलमानने त्याच्या बीइंग ह्युमन या संस्थेद्वारे कित्येक जणांना मदत केली आहे. काहींना ऑपरेशन करायचं असायचं, काहींना इतर मदतीची गरज होती. रोज चारशेहून अधिक लोक मदतीच्या आशेनं तिथे यायचे.”
दरम्यान, सलमान खान आणि जेलमध्ये असलेल्या लॉरेन्श बिश्नोईबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत. याच गँगच्या नावाने नुकतीच मुंबई पोलिसांना धमकी देखील देण्यात आली आहे. सोबतच 5 कोटींची मागणीही करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांचे जसे हाल झाले, तसेच सलमानचे हाल होतील, अशी धमकी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सलमान खानने माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. त्यावरच सलीम खान (Salim Khan) यांनी भाष्य केलंय.
News Title – Salman will not apologize says Salim Khan
महत्त्वाच्या बातम्या-
आज शनीदेव कोणत्या राशींवर असणार मेहेरबान?, वाचा राशी भविष्य
आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर, भरपत्रकार परिषदेत घडलं असं काही की…
कियाची जबरदस्त फीचर्ससह कार बाजारात लाँच; जाणून घ्या सर्वकाही
अजितदादा गटात नाराजी! दोन्ही रुपालींमध्ये नेमका वाद काय?
अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्याचं विधान






