सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा सलमानवर अत्यंत गंभीर आरोप!

On: December 3, 2022 10:29 AM
---Advertisement---

मुबंई | अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो कलर्स वाहिनीवरील ‘बिग बाॅस’ या रियालिटी शोच सूत्रसंचालन करण्यात व्यस्त आहे.

वयाची पन्नाशी झाली तरीदेखील लग्न झालं नसल्याने सलमान भाई त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चीले जातात. अनेकदा त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं जातं. त्याचा राग अनेकवेळा त्यांच्या ब्रेकअपच (Breakup) कारण ठरल्याचं सांगितलं जातं.

अशावेळी नुकताच त्याची एक्स म्हणून कधी काळी चर्चेत असणाऱ्या सोमी अली (Somi Ali) या अभिनेत्रीने पोस्ट केली आहे. जी तीने नंतर ती डिलीट केली. मात्र अगदी काही वेळातच ती पोस्ट व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने सलमानचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे.

पोस्टमध्ये तिनं लिहलंय भारतात माझा शो बॅन(Ban) केला. मला कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तु एक नीच माणूस आहेस. सिगारेटचे चटके देऊन तु माझं शारिरीक शोषण केलं आहे. माझ्याकडे 50 वकील आहेत, असं तीन सलमानच्या नावाचा उल्लेख न करता लिहलं आहे.

सलमानाच्या बाजूने उभे राहणाऱ्या त्याला समर्थन देणाऱ्य़ा अभिनेत्रींविषयी देखील सोमीन लिहिलं आहे. कित्येक महिलांचा आणि मुलींचा शारिरीक छळ करणाऱ्या सलमान खानला तुम्ही पाठिंबा देता. अशा अभिनेता-अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे. असं तीनं लिहलं आहे.

अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान हे काहीवर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. ते अनेक वर्ष सोबत होते. सलमानच्या आई-वडिलांसोबत देखील सोमीचे चांगले नाते होते. यापुर्वी देखील सोमीने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते.

थोडक्य़ात बातम्या

Join WhatsApp Group

Join Now