Salman Khan Bulletproof Car l दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे लॉरेन्श बिश्नोई गँग असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बॉलिवूड स्टार सलमान खानला देखील लॉरेन्श बिश्नोई गँगकडून वारंवार धमकी येत आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खानने एक खास बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे. मात्र हि कार नेमकी कोणती आहे आणि तिची किंमत किती आहे हे जाणून घेऊयात…
या कारसाठी सलमान खानने मोठी रक्कम मोजली :
अभिनेता सलमान खानने Nissan Petrol SUV ही बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. या कारसाठी सलमान खानने देखील मोठी रक्कम मोजली आहे. सलमान खानने एप्रिल 2023 मध्ये ही कार दुबई येथून मागवली होती. तसेच ही एक बुलेटप्रूफ एसयुव्ही आहे. सलमान खान आता याच एसयुव्ही कारने मुंबईत देखील फिरतो.
Nissan Patrol SUV ही त्याची दुसरी बुलेटप्रूफ कार आहे. यापूर्वी सलमान खान टोयोटा लँड क्रूझर प्राडो एसयुव्हीने या कारने फिरत होता. अशातच आता Nissan Petrol SUV ही दुसरी एसयुव्ही कार सलमान खानने दुबई येथून मागवली आहे. तसेच5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिनची ही Nissan Petrol SUV 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि स्टँडर्ड फोर-व्हील ड्राईव्ह सिस्टमसह मिळत आहे.
Salman Khan Bulletproof Car l या कारची किंमत किती आहे? :
सलमान खानची ही बुलेट प्रूफ कार Nissan Petrol भारतीय बाजारात मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे निसान पेट्रोल ही कार जवळपास 2 कोटी रुपयांच्या घरात सलमान खानने खरेदी केली आहे. बुलेटप्रुफिंग क्षमतेमुळे आणि इतर फीचर्समुळे या कारची किंमत देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणी एक केस सुरू आहे. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नाई सलमान खानला वारंवार धमकी देत आहे. अगदी त्यामुळे सलमान खानने बुलेटप्रूफ एसयुव्ही कार खरेदी केली आहे.
News Title – Salman Khan Bulletproof Car
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?
सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या भाव
उद्धव ठाकरेंचा महायुतीला दुहेरी धक्का; दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर?
आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!






