Salman Khan | अभिनेता सलमान खान याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, ऐश्वर्यासोबतच्या त्याच्या नात्याची चर्चा आजही होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि ऐश्वर्या राय नंतर काही कारणांमुळे वेगळे झाले. त्यांची जोडी तेव्हा प्रचंड प्रसिद्ध होती.
दरम्यान, याआधी सलमानचे (Salman Khan) अभिनेत्री सोमी अलीवर प्रेम होते. सोमी आणि सलमान काही काळासाठी नात्यात होते. अलीकडेच सोमीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. शिवाय, सलमानवर सोमीने काही गंभीर आरोप देखील केले आहेत.
शारीरिक छळाचा आरोप?
मुलाखतीमध्ये बोलताना सोमी म्हणाली की, सलमान (Salman Khan) मला रोज शारीरिक आणि मानसिकरित्या चुकीची वागणूक द्यायचा. अनेक वेळा त्याने मला सिगारेटचे चटके देखील दिले आहेत. त्यामुळे मी नंतर बॉलिवूडमध्ये थांबले नाही. पुढे ती म्हणाली की, सलमानच्या वन नाईट स्टँडला कंटाळून मी बॉलिवूड सोडले. सलमानच्या एक नाही तर आठ वन नाईट स्टँडला मी खूप कंटाळले होते.
ऐश नावाच्या मुलीला घेऊन…
“जेव्हा माझा बॉयफ्रेंड ऐश नावाच्या मुलीला घेऊन आला तेव्हा मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळले होते. त्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं,” असा खुलासा सोमीने केला. सोमीने केलेल्या या खुलाशाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
सोमीमुळे सलमानचे लग्न मोडल्याचेही म्हटले गेले आहे. सलमान आणि संगीता बिजलानी या दोघांचे लग्न ठरले होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी दोघांच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. दरम्यान, संगीताने लग्नाच्या एक दिवस आधी दोघांना रंगेहाथ पकडले होते, असा दावा केला जात आहे.
एवढेच नाही तर सलमानला मिळालेल्या धमकीनंतर सोमी अली सलमानसाठी धावून आली होती. या खुलाशांमुळे सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तो काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






