Salman Khan | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याने चर्चेत आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बिश्नोई गँगच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला वारंवार बिश्नोई गँगच्या धमक्या येत असताना आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सलमान खानची (Salman Khan) एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने सलमान खानचे वर्तन आणि महिलांसोबतचे संबंध याबाबत गंभीर आरोप केले आहेत. सलमान खानच्या असुरक्षिततेमुळे लोक तिच्याशी बोलायचे नाहीत, असेही सोमीने सांगितले. सलमानच्या वन नाईट स्टँडमुळे ती नाराज असल्याने तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने सांगितले आहे.
एक्स गर्लफ्रेंडचा दावा-
अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. सलमानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अली हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच्या वेळीचे खुलासे केले आहेत. सोमी अलीने काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईला भेटण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली होती. नोव्हेंबर महिन्यात ती लॉरेन्स बिश्नोईला भेटणार असल्याचेही तिने म्हटले होते. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता तिने सलमानबाबत अनेक दावे करत त्याच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
सलमान खानचा खास पॅटर्न-
सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना सोमी म्हणाली की, सलमान खानचा महिलांसोबत एक खास पॅटर्न आहे, त्यानुसार तो बहुतेक सात वर्षे त्यांच्यासोबत राहतो. विशेष म्हणजे सलमान कधीच नाते तोडत नाही, पण मुलगी नाते तोडून निघून जाते.
View this post on Instagram
‘या’ कारणामुळे सोडली इंडस्ट्री
सोमीने सांगितले की, सलमान खानच्या एक नव्हे तर आठ वन नाईट स्टँड्समुळे तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. “दररोज होणारा शारीरिक (Physical) आणि मानसिक छळ (Mental Harassment) मला सहन होत नव्हता. मी त्याच्या वन नाईट स्टँडमुळे दुःखी होते, म्हणून मी माझ्या अभ्यासावर (Studies) लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि इंडस्ट्री सोडली,” असे सोमीने सांगितले.
सोमी अलीची नाराजी
सोमी अलीने एका मुलाखतीत सांगितले की, तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण आजही लोक तिला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड म्हणून ओळखतात, जे तिला आवडत नाही. सोमी अली म्हणाली की, “मी खूप वर्षांपूर्वी ॲक्टिंग करिअर सोडले आहे. मी अमेरिकेत माझ्या एनजीओचे काम करत आहे, जे खूप चांगल्याप्रकारे सुरू आहे. अमेरिकेत मी चांगले काम केले आहे.
मी खूप काही कमावले आहे, पण तरीही लोक मला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड या नावाने ओळखतात.” सोमी अलीने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.या आरोपांमुळे सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या आरोपांना तो कशाप्रकारे उत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






