Salman-Aishwarya | बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Salman-Aishwarya) यांच्या नात्याची आजही चर्चा आहे. सध्या ऐश्वर्या आणि पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची सुरुवात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके’ सिनेमातून झाली. 6 वर्ष ऐश्वर्या – सलमान (Salman-Aishwarya) यांनी एकमेकांना डेट केलं. दोघांच्या लग्नांच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. त्यांच्यातील नातं फार काळ टीकू शकलं नाही.
जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या (Salman-Aishwarya) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या. घडलेला प्रकार अभिनेत्रीनं चाहत्यांना सांगितला. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या राय हिने सलमान खानसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेत्रीने सलमानवर गंभीर आरोप केले होते.
ऐश्वर्याचा सलमानवर गंभीर आरोप
ऐश्वर्या राय म्हणाली, सलमान खान याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक अडचणींचा सामना केला. शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला आहे. यामुळे ऐश्वर्याने सलमानसोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. (Salman-Aishwarya)
सलमानसोबत असलेलं नात ऐश्वर्याला मान्य नव्हतं
अशातच सलमान आणि ऐश्वर्या (Salman-Aishwarya) यांच्यातील नातेसंबंधावर सोहेल खान याने खुलासा केला आहे. सलमानसोबत ऐश्वर्याचं असलेलं नात ऐश्वर्याला मान्य नसल्याचं सोहेल खान म्हणाला. ऐश्वर्या नेहमी कुटुंबियांसोबत आनंदीत असायची. पण कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही, असं सोहेल खान म्हणाला आहे.
दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री आपल्या माहेरी आईकडे आपली मुलगी आराध्यासोबत राहत आहे. नुकतंच अंबानी कुटुंबातील शाही विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चन कुटुंबापासून दूर दिसत होत्या. तर बच्चन कुटुंब हे एकाबाजूला होतं.
News Title – Salman-Aishwarya Relationship On Sohail Khan Statement Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
वरळीत आणखी एक हिट अँड रनप्रकरण; अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले
राज्यात पावसाचा जोर ओसरला तरी धोका कायम; पुढचे 4 दिवस..
महादेवाच्या कृपेने ‘या’ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे मार्गी लागतील!
अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या सभेत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘जय महाराष्ट्र, जय एकनाथ’; शपथविधीवेळी भावना गवळी यांची घोषणा






