‘मी तुला हजार रुपये देईन, पण…गालावर दहा वेळा किस करायचे’, सैफ अली खानकडे धक्कादायक मागणी

On: September 29, 2025 10:46 AM
Saif Ali Khan
---Advertisement---

Saif Ali Khan | बॉलीवूड सुपरस्टार सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत (Interview) त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. बॉलिवूडमध्ये (Bollywood) नाव कमावण्यासाठी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, त्यावेळी त्याला काही अजब अनुभवही आले.

“मी तुला हजार रुपये देईन, पण त्याच्या बदल्यात मला माझ्या गालावर दहा वेळा किस करायचे” :

सैफने मुलाखतीत सांगितले की, एकदा एका महिला निर्मातीने (Producer) त्याच्याकडे धक्कादायक मागणी केली होती. “मी तुला हजार रुपये देईन, पण त्याच्या बदल्यात मला माझ्या गालावर दहा वेळा किस करायचं आहे”, असे ती निर्माती म्हणाली होती. हा अनुभव सांगताना सैफनेही आश्चर्य व्यक्त केले.

स्ट्रगलच्या (struggle) काळाबद्दल बोलताना सैफ म्हणाला, “मी सेकंड लीड, थर्ड लीड अशा सगळ्या भूमिका केल्या. काही चित्रपट चांगले होते, पण एक काळ असा होता जेव्हा एकामागून एक सगळे सिनेमे (Movies) फ्लॉप होत होते.”

सैफ आली खान बॉलीवूड मधला एक मोठा अभिनेता :

आज सैफ आली खान (Saif Ali Khan) बॉलीवूड मधला एक मोठा अभिनेता आहे. सैफ अली खानने 1993 मध्ये ‘परंपरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘दिल चाहता है’, ‘हम तुम’, ‘कल हो ना हो’, ‘रेस’, ‘लव्ह आज कल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्याने दमदार भूमिका केल्या. आता तो ‘जिस्म 3’ आणि ‘हैवान’ या नव्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, सैफने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत (Amruta Singh) लग्न केले होते. या विवाहातून त्यांना सारा (Sara) आणि इब्राहिम (Ibrahim) अशी दोन मुलं आहेत. मात्र 13 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट (Divorce) झाला. त्यानंतर 2012 मध्ये सैफने करिना कपूरसोबत (Kareena Kapoor) लग्न केले आणि आता या जोडप्याला तैमुर (Taimur) आणि जेह (Jeh) अशी दोन मुलं आहेत.

News Title : Saif Ali Khan Reveals Shocking Request from a Producer During His Struggle Days.

 

Join WhatsApp Group

Join Now