सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर!

On: January 18, 2025 1:36 PM
Saif Ali Khan Health Update his condition improving
---Advertisement---

Saif Ali Khan Health Update | अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी (Thursday) मध्यरात्री (Midnight) राहत्या घरी जीवघेणा हल्ला (Deadly Attack) झाला होता. हल्लेखोराने (Attacker) अभिनेत्यावर सहा वार केले. रक्तबंबाळ (Bleeding) झालेल्या सैफला तात्काळ रिक्षाने (Auto-rickshaw) रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. (Saif Ali Khan Health Update)

सध्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर सहा वार झाले होते. त्यामधील दोन वार अधिक गंभीर होते, ज्यासाठी सैफची शस्त्रक्रिया (Surgery) देखील करण्यात आली.

सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून महत्त्वाची माहिती

आता रुग्णालयाकडून सैफच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्याचे हेल्थ अपडेट (Health Update) रुग्णालय प्रशासनाने (Hospital Administration) जारी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफची प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम आहे. आता अभिनेत्याला आयसीयू (ICU) मधून नॉर्मल रूममध्ये (Normal Room) शिफ्ट (Shift) करण्यात आले आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असेही सांगण्यात येत आहे.

पाठीच्या कण्यातील (Spinal Cord) चाकूचा तुकडा काढला

सैफ अली खानच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकू (Knife) घुसला होता आणि तो तुटला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तुटलेल्या चाकूचा तुकडा काढून टाकला आहे. अभिनेत्याच्या मानेलाही (Neck) गंभीर जखम (Serious Injury) झाली आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर (Stable) आहे. (Saif Ali Khan Health Update)

लवकरच मिळणार डिस्चार्ज

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. पण, अभिनेता काही दिवस चालू फिरू शकणार नाही. त्याला विश्रांतीची (Rest) गरज आहे. (Saif Ali Khan Health Update)

Title : Saif Ali Khan Health Update his condition improving

महत्वाच्या बातम्या- 

गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, व्हायग्रा घेतली अन्…, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत आणखी एक खुलासा, दुसऱ्या पत्नीच्या नावावर…

‘हल्लेखोराने दागिन्यांना हातही लावला नाही’; करिनाचा धक्कादायक खुलासा

‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

रिलायन्स जिओचं मोठं पाऊल, Airtel आणि Vi पुन्हा एकदा टाकलं मागे

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now