सैफला चाकूने का मारलं?, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

On: January 17, 2025 1:24 PM
Saif Ali Khan Attack
---Advertisement---

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरावर मध्यरात्री झालेल्या चाकू हल्ल्याने संपूर्ण मुंबई हादरली आहे. आज मध्यरात्री एका चोरट्याने घरात घुसून सैफवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

महिला कर्मचाऱ्यानेच हल्लेखोराला घरात प्रवेश दिल्याचा संशय

या प्रकरणात सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. एका महिला कर्मचाऱ्यानेच आरोपीला घरात प्रवेश दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेने हल्लेखोराला घरात शिरताना पाहिले आणि आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोराने महिलेवर चाकूने वार केले. तिच्या आवाजाने सैफ मदतीसाठी धावला आणि झटापटीत हल्लेखोराने सैफवरही वार केले.

सात पथकांकडून कसून तपास; चार कर्मचारी ताब्यात

या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचची सात पथके कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी घरातील चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे.(Saif Ali Khan)

हल्लेखोराचा उद्देश अस्पष्ट; महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा असल्याचा दावा

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हल्लेखोर सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा होता. त्याने घरात शिरून रात्रभर दबा धरून बसल्याचेही निष्पन्न झाले आहे. मुख्य दरवाजाला बगल देऊन, पहिल्या खोलीतून तो घरात घुसला होता. मात्र, या हल्ल्यामागील मुख्य हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. (Saif Ali Khan)

Title: Saif Ali Khan Attacked with Knife in his Mumbai Home

महत्त्वाच्या बातम्या :

‘नाशिकमधील आश्रमात…’; सरपंच हत्या प्रकरणी तृप्ती देसाईंचा खळबळजनक आरोप

‘सगळेच्या सगळे फासावर…’; सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य

आता मनमानी चालणार नाही, BCCI च्या 10 नियमांमुळे खेळाडूंना जोर का झटका

सिंगल की मिंगल?, कार्तिक आर्यनचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा

नवऱ्याला बिअर पाजली नंतर बॉयफ्रेंडला बोलवलं, पत्नीच्या कृत्यानं पोलिसही हादरले

Join WhatsApp Group

Join Now