Saie Tamhankar | अॅक्शन आणि वास्तव घटनांवर आधारित ‘ग्राउंड झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ (Narendra Nath) यांच्या खऱ्या घटनांवर आधारित ही कथा असून 2001 मधील संसदेवरील हल्ल्याच्या तपासाची ही कहाणी आहे. चित्रपटात इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) प्रमुख भूमिकेत आहेत.
कार्यक्रमात कलाकारांची खास उपस्थिती-
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात प्रमुख कलाकारांनी आपली खास उपस्थिती नोंदवली. इमरान हाश्मीने पांढऱ्या टी-शर्टसोबत पांढऱ्या पँटचा पेहराव केला होता आणि त्यावर पिच रंगाचा जॅकेट परिधान करून त्याने एक स्टायलिश लूक साकारला.
View this post on Instagram
दुसरीकडे सई ताम्हणकरने गुलाबी रंगाची साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या साडीला आकर्षक सोनेरी बॉर्डर होता. ओपन हेअर, हलकासा ग्लॉसी मेकअप, गुलाबी लिपस्टिक आणि ठळक काजळसह छोट्या टिकलीने तिने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला. यावेळी झोया हुसेन (Zoya Hussain) आणि दिग्दर्शक तेजस देवस्कर (Tejas Deoskar) यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती होती.
कलाकारांची तगडी फौज-
या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केले असून झोया हुसेन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, ललित प्रभाकर, रॉकी रैना आणि राहुल वोहरा हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनांवर आधारित आणि थरारक अॅक्शनने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवण्यास सज्ज झाला आहे.






