Sai Baba Idols | वाराणसी शहरातील मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा यांच्या मूर्ती हटवल्याने नवीन वाद उफळून आला आहे. आतापर्यंत सनातन रक्षक संस्थेने शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवून त्या गंगेत विसर्जित केल्या आहेत. यामुळे भक्तांमध्ये संतापची लाट उसळून आली आहे. या सर्व प्रकरणाची सध्या देशभर चर्चा रंगली आहे. (Sai Baba Idols)
सनातन रक्षक संस्थेकडून वाराणसीच्या आणखी 28 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सनातन रक्षक संघटनेचे अजय शर्मा यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं आहे. साईबाबा यांचा सनातन हिंदू धर्माशी कोणताही संबंध नाही, असं वक्तव्य करत त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
वाराणसीच्या मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
“साईबाबा मुस्लीम होते. कोणीही साईबाबांची भक्ती, पूजाअर्चा करत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्ही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती ठेवून देणार नाही.”, अशी भूमिका रक्षक संघटनेचे अजय शर्मा यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात साईबाबा यांची ख्याती आहे. राज्यात शिर्डी येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भेट देतात. मात्र, आता काशीत साईबाबा यांना विरोध करण्यात आला आहे. साईबाबा यांची पूजा ही प्रेतपूजा असल्याचं सनातनी धर्मियांनी म्हटलं आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय. (Sai Baba Idols)
सनातन रक्षक संघटनेने मूर्ती हटवल्या
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात साईबाबा यांना चांदबाबा म्हणावे, असे नमूद करण्यात आल्याचा दावा सनातन रक्षक संघटनेचे दीपक यादव यांनी केला आहे. याच निकालाचा दाखल देत सोमवारपासून वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात झाली आहे. (Sai Baba Idols)
अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी देखील या प्रकरणाला समर्थन दिले आहे. साईबाबा हे धर्मगुरु, पीर, अवलिया असू शकतात, पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरांमधून त्यांच्या मूर्ती हटवल्या पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
News Title : Sai Baba Idols removed from Varanasi temple
महत्वाच्या बातम्या –
विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य
अजित पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी फुंकणार
“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल






