एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!

On: November 19, 2024 12:31 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्याने उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का :

विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण कल्याण-डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने त्याचा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. कारण कल्याण-डोंबिवलीमध्ये बहुतांश शिवसैनिक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत देखील या भागातून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे निवडून आला आहे.

Maharashtra l कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्ष :

मात्र या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न देखील सुरु आहेत. मात्र आता सदानंद थरवळ यांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणं हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघर्ष करत असताना सदानंद थरवळ उद्धव ठाकरेंसोबत होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने सदानंद थरवळ यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. मात्र अशातच आता त्यांनी ठाकरेंना सोडचिट्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

News Title : sadanand tharwal join eknath shinde

महत्वाच्या बातम्या –

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

बारामतीमध्ये खळबळ; श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये धडकले पोलीस, नेमकं काय घडलं?

ग्राहकांना झटका! निवडणुकीपूर्वीच सोनं महागलं, भावात एकदमच झाली ‘इतकी’ वाढ

मतदान कार्ड हरवलंय? तर या ओळखपत्रांआधारे करता येणार मतदान

निवडणुकीत उतरलेल्या 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार भाजपात?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now