शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..

On: November 7, 2024 10:31 AM
Sadabhau Khot
---Advertisement---

Sadabhau Khot | भाजप महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पवारांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असं वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं होतं. या टिकेनंतर एकच संताप व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीसह अजित पवार गटाकडून खोत यांचा निषेध करण्यात आला. सर्वत्र टीकेची झोड उठताच खोत यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. (Sadabhau Khot)

सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली

“कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

“मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची भाषा समजते.”, असंही ते म्हणाले. (Sadabhau Khot)

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी बँका हाणल्या आहेत. तसेच कारखाना देखील हाणाला आहे, पण आता शरद पवारांनी येवढं हाणलं तरी ते भाषणात म्हणतात की, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. तसेच मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा? आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा खोचक सवाल करत सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाचार घेतला आहे. “ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – Sadabhau Khot apologizes for his comments on Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

दरवाढीचं सत्र सुरूच, सोनं पुन्हा महागलं; जाणून घ्या आजच्या किमती

‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!

Join WhatsApp Group

Join Now