संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…

On: November 7, 2024 1:38 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut l विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच सदाभाऊ खोत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांना गावगाडा माहिती नाही. पण तुम्ही 2014 आणि 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता असा थेट पलटवार आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

संजय राऊतांवर सडकून टीका :

याशिवाय आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र त्या टीकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सदाभाऊ खोत यांना अत्यंत कडक शब्दात फटकारले आहे. मात्र त्यानंतर सर्वत्र टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर थोबाडीत द्यायला हवी होती अशी टीका केली. मात्र त्या टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांची तुलना थेट डुकराशी केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Sanjay Raut l तुमच्यात कसलाही इमानदारपणा आहे का? :

यासंदर्भात सदाभाऊ म्हणाले की, 2019 मध्ये तुम्ही भाषण करत होता. त्यावेळी सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला होता. मात्र तुमच्यात कसलाही इमानदारपणा आहे का? तसेच कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्रान तुमचं कौतुक देखील केलं असतं.

मात्र तरी देखील मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी ते डुक्कर गटारात जातंचं अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

News Title – Sadabhau khot against on sanjay raut

महत्त्वाच्या बातम्या-

“मी आमदार झालो तर पोरांचे लग्न करुन देणार”,’या’ उमेदवाराचं अजब आश्वासन

“फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते..”; राऊत संतापले

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर

शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now