CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘हा’ खेळाडू IPL मधून बाहेर

On: April 11, 2025 7:32 PM
Ruturaj Gaikwad
---Advertisement---

CSK IPL 2025 | आयपीएल 2025 हंगामात चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) संघाची कामगिरी अपेक्षित पातळीवर नसल्यानं आधीच अडचणीत असलेल्या संघाला आता आणखी एक मोठा धक्का बसलाय. संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपरकिंग्सने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली असून उर्वरित सामन्यांसाठी नव्या कर्णधाराची देखील नियुक्ती केली आहे.

सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात ऋतुराजच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला केवळ एक्स-रे करण्यात आला, मात्र त्यात काही स्पष्ट न झाल्यामुळे एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यामध्ये फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आणि त्यामुळे ऋतुराज हंगामातून बाहेर पडला आहे. संघासाठी त्याने ज्या प्रकारे प्रयत्न केले त्याबद्दल प्रशिक्षकांनी कौतुकही व्यक्त केले.

एमएस धोनीकडे पुन्हा कर्णधारपद, बॅटिंग लाईनअपवर परिणाम होण्याची शक्यता

ऋतुराज गायकवाड हा संघाचा केवळ कर्णधार नव्हता, तर तो चेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ होता. राजस्थान रॉयल्स विरुद्ध 30 मार्च रोजी झालेल्या सामन्यात तुषार देशपांडे (Tushar Deshpande) च्या बॉलवर ऋतुराजच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाली होती. तरीही दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यांत त्याने मैदानात उतरत आपली जबाबदारी पार पाडली. मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेणे गरजेचे ठरले आहे.

ऋतुराजच्या अनुपस्थितीत आता एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा संघाचं नेतृत्व करणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात धोनी अद्याप अनकॅप्ड खेळाडू म्हणून सहभागी आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल अपेक्षित आहे. संघाला आता प्लेइंग 11 मध्ये महत्त्वाचे बदल करावे लागतील. आयपीएल 2025 मध्ये चेन्नईने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले असून सध्या ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार बदलाच्या निर्णयानंतर सीएसके पुन्हा फॉर्ममध्ये येईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Title : Ruturaj Ruled Out, Dhoni Back as CSK Captain

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now